घ्या एकच झेंडा हाती !
गोष्ट लाख मोलाची मित्रहो, गोष्ट लाख मोलाची । समदं होईल सुरळीत मित्रहो, घ्या एकच झेंडा हाती ।। ध्रु ।। कुठे दगडफेक तर कुठे आगजनी, तुटल्या एकमेकांवर जाती । मरणारे भारतीय तर मारणारे ही भारतीय, मग का देता दुःख आपल्यांच्याच वाटी ।। गोष्ट लाख मोलाची..... महापुरुषे होवून गेलें लढले देशासाठी, त्यांनी ही न विचारात आणल्या कोणकोणत्या आपल्या जाती । कोणी न निळे, कोणी न हिरवे, ना कोणी नारंगी, द्या साथ मैत्रीची (पांढरा), घ्या तिरंगा झेंडा हाती ।। गोष्ट लाख मोलाची मित्रहो, गोष्ट लाख मोलाची । समदं होईल सुरळीत मित्रहो, घ्या तिरंगा झेंडा हाती ।। - Pratap Singh